Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बी.टी.कापसावर गुलाबीअळीचा हल्ला

बी.टी.कापसावर गुलाबीअळीचा हल्ला
, मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (17:07 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील परीसरात संपुर्ण कापुस पीक गुलाबी अळीने खल्लास केल्याच्या  बातम्यासमोर समोर आल्यावर आता संपुर्ण विदर्भ मराठवाड्यातील ४० लाख हेक्टरमधील उभे कापसाचे अभूतपूर्व गुलाबी अळीच्या हल्ल्याने संपुर्ण नष्ट झाल्याने हे या दशकातील  सर्वात मोठे आर्थिक संकट असुन महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या
 
कापसाच्या पिकांचे कमीतकमी रुपये १० हजार कोटीचे कमीतकमी नुकसान होत असुन यामुळे अळीच्या हल्ल्याने तूर व सोयाबीनचे पीक गारद झाल्याचा माहीती     कै वसंतराव नाईक शेतकरी स्वा. मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  सादर केलेल्या मराठवाडा व विदर्भाच्या कापुस उत्पादक क्षेत्राचा दौरा  करून   सादर केलेल्या अहवालात दिली  आहे .
 मागील वर्षी सोयाबीन व तुर या पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विदर्भ व दशकातील शेतकऱ्यांना पडेल भावामुळे झालेल्या  विक्रमी तोट्याचा सामना केल्यानंतर  यावर्षी महाराष्ट्रात कापसाच्या विक्रमी सुमारे ४८ लाख हेक्टरमध्ये बी . टी . कापसाच्या कृषी विभागाच्या यावर्षी बी. टी . कापसाच्या प्रजातीवर मोठयाप्रमाणात गुलाबी अळीचा मारा होणार या सावधानतेचा इशाऱ्याला न जुमानता केलेली पेरणी आता थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी ,  गुलाबी अळी यांच्या अनियंत्रित हल्ल्यामुळे धोक्यात  येत असल्याची गंभीर चिंता तिवारी यांनी ऑगस्ट महिन्यातच सरकारला दिली होती.
जगात बोन्डअळीमुळे  अख्खी कापसाची उभे पीक नष्ट होत असल्यामुळे व कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर सुरु झाल्याने  अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीने "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" म्हणजे बी टी कापसाचे बियाणे १९९१ मध्ये आणले भारत सरकारने या बी टी बियाण्याला २००४ मध्ये सरसकट वापराची परवानगी मोनसँट्रो या कंपनीला प्रती ४५० ग्रॅमच्या संकरीत बियाणांच्या  मुळकिंमतीच्या चौपट किंमत  आकारून दिली सुरवातीला कीटक नाशकाच्या  वापरात घट आली व भारतामध्ये कापसाचे उत्पादन विक्रमी झाले मात्र २००८ पासुन उत्पादन घट येण्यास सुरुवात झाली व २०११ नंतर या बी टी कापसावर थिप्स ,मिलीबग ,बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्ला होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली मात्र मागील दोन वर्षात गुजरात ,तेलंगणा ,पंजाब व मराठवाड्यात मोठयाप्रमाणात बॊडअळी ,  गुलाबी अळी यांचा हल्लामुळे नापिकीच्या घटना समोर आल्या आहेत यामुळेच महाराष्ट्राच्या कृषी विभागाने  मागीलवर्षीच्या तक्रारीवरून राशी  कंपनीच्या बी टी बियाण्यावर बंदी टाकली आहे मात्र यावर्षी संपुर्ण विदर्भ व मराठवाड्यात अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे तंत्र अळीमध्ये यातील विषाणूवर  निरोधकता आल्यामुळें पुर्णपणे अयशस्वी होत असल्यामुळे केंद्र सरकारने या संकटावर तोडगा काढावा व सरळ वाणाचे हायब्रीड कापसाचे बियाणे  उपलब्ध करावे अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे .
केंद्रातील कृषी मंत्रालय व भारतीय कृषी संशोधन संस्था या भारतातील १३० लाख हेक्टरमधील कापसाच्या पिकावरील संकटावर पुर्णपणे उदासीन असुन  महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने या बी टि कापसाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी लिहलेल्या पत्रात आपण शेतकऱ्यांना देशी सरळ वाणाचे बियाणे वापरण्यासाठी सांगा असा सल्ला देण्यात आला होता मात्र देशात १३० लाख हेक्टरसाठी  कापसाचे बियाणे तर  सोडा १३० हेक्टर वर पेरण्यासाठीही बियाणे नाहीत हे सत्य तिवारी यांनी मुख्यमंत्री समोर मांडले आहे . जर अमेरीकेच्या मोनसँट्रो या कंपनीचे  "बोन्डअळीरक्षक बोल गार्ड" हे शोधतंत्र निकामी झाले आहे तर बी टी बियाणांची मुळ संकरीत बियाणाची २०० रुपये प्रती पाकीटाची किंमत  लागू करण्याचा कृषी विभागाचा केंद्र सरकारला सादर   केलेला प्रस्ताव तात्काळ लागु  करावा  व बी टी बियाणांच्या कंपन्याची दलाली करण्यावर कारवाईची मागणी किशोर तिवारी केली आहे .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोट बंदीने लहान व्यवसायिकांना मोठा फटका, अजूनही अडचणी कायम