Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपरी-चिंचवड शहरातील 16 केंद्रांवर शनिवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस

पिंपरी-चिंचवड शहरातील 16 केंद्रांवर शनिवारी मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस
, शुक्रवार, 16 जुलै 2021 (22:32 IST)
शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला तर 45 वर्षांपुढील नागरिकांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस उद्या (शनिवारी) 16 केंद्रांवर मिळणार आहे. तर, 18 ते 44 या वयोगटातील आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 2 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ”कोविशिल्ड’ चा पहिला डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
 
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, संत तुकारामनगर, अहिल्याबाई होळकर महापालिका शाळा सांगवी, खिवंसरा हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि प्रेमलोक पार्क दवाखाना या 8 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 300 च्या क्षमतेने लस मिळणार आहे. कोविन ॲपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
 
तर, ज्या 45 वर्षांपुढील नागरिकांनी, एचसीडब्ल्यू आणि फ्रंट लाईन वर्कर यांनी पूर्वी ‘कोविशिल्ड’ या लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ‘कोविशिल्ड’ या लसीचा दुसरा डोस हा 12 ते 16 आठवडयांच्या दरम्यान (84ते 112 दिवस) देण्यात येणार आहे. उद्या 8 केंद्रांवर कोविशिल्डचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
प्राथमिक शाळा म्हेत्रे वस्ती, इएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, दीनदयाळ शाळा संत तुकारामनगर पिंपरी, नवीन भोसरी रुग्णालय, कासारवाडी दवाखाना,महापालिका शाळा रहाटणी, पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा आणि जुने तालेरा रुग्णालय या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उद्या सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिला जाणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने हे लसीकरण करण्यात येणार आहे. तर, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन जिजामाता रुग्णालयात लस देण्यात येणार आहे.
 
कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
 
18 ते 44 या वयोगटातील लाभार्थ्यांना फकीरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड, येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा, तर 45 वर्षांपुढील नागरिकांना पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
गरोदर महिलांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस !
 
सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स रिटेलने Just Dial मध्ये मोठा हिस्सा खरेदी केला, हा करार 3497 कोटी रुपयांवर झाला, ही योजना आहे