मुंबईतील विक्रोळीजवळ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाइलिंग क्रेन घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलिंग क्रेन अंगावर पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले असून क्रेन ट्रक वर चढवण्यात आली.
सदर अपघात विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी ट्रेलर ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
या अपघातात एका दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. विपुल पांचाळ(44) असे या जखमीचे नाव आहे. विपुल हे दुचाकीवरून कांदिवली कडे जात असताना जवळच असलेल्या एका ट्रेलर ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे वाहनावर ठेवलेले अवजड यंत्र पांचाळ यांच्यावर पडले आणि ते गंभीर जखमी झाले. स्थानिक लोकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली
पोलिसांनी ट्रेलर ट्रक चालकाला भारतीय दंड संहिता कायद्यांतर्गत निष्काळजीपणे वाहन चालवल्या बद्दल आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमानुसार अटक करण्यात आली आहे.