Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक आश्रम शाळेतील ५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

crime
, गुरूवार, 3 नोव्हेंबर 2016 (17:27 IST)
एक मोठा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे. मध्ये  बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगावातील आदिवासी आश्रमशाळेतल्या 5 मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर पोलिसांनी तपास कारत लगेच   10 नराधमाना  पोलिसांनी अटक केली आहे.त्यामुळे राज्यातील असलेल्या आश्रम शाळतील   सुरक्षित   नाहीत  आणि  सरकारचा  कोणताच  धाक  यांच्यावर   नाही   असे दिसून  आले.  
 
बुलढाणा येथील खामगावात निनाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळा आहे. या ठिकाणी शिकणा-या पाच मुली दिवाळीत सुट्टी साठी  त्यांच्या घरी गेल्या होत्या. घरी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार त्यांच्या आईवडिलांना सांगितला आणि हा प्रकार समोर आला आहे. पालकांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंशी संपर्क साधला. त्यानंतर खडसेंनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी संपर्क साधला. फुंडकरांच्या सूचनेवरुन पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलींच्या म्हणण्यानुसार 8 विद्यार्थिनींवर अत्याचार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण किती लोकांनी केले आहे हे पोलीस शोधात असून , त्यामुळे राज्याची कायदा व्यवस्थेवर  प्रश्न  निर्माण झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलिसांच्या प्रश्नांनी अपमानित होऊन महिलेने केस मागे घेण्याचा निर्णय, नवर्‍याच्या मित्रांनी केला होता गँगरेप