Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे
, मंगळवार, 7 मार्च 2017 (16:50 IST)
हत्या, दहशतवादी कारवाया यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महाराष्ट्र जगाच्या पाठीमागे आहे,अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्त केली. अशा गुन्ह्यांच्या तपासकामात अद्ययावत तंत्रे वापरून जग पुढे गेले आहे. मात्र, महाराष्ट्रासारखी काही राज्ये अजूनही जुन्यातच अडकून पडली आहेत तसेच राज्यांतील विविध तपास यंत्रणा अयोग्य पद्धतीने चौकशी करतात परिणामी आरोपींच्या सुटकेचा मार्ग मोकळा होतो, असे मत न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.
 
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक निखील राणे यांची आठ वर्षापूर्वी नोव्हेंबर 2009 मध्ये भरदिवसा पुण्यात हत्या झाली. मात्र  आरोपींचा छडा लावण्यास पुणे पोलीस तसेच सीआयडी पोलीसांना अपशय आल्याने हा तपास सीबीआयकउे वर्ग करावा अशी मागणी करणारी याचिका राणे यांच्या पत्नी अश्‍विनी राणे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. याचिकेवर सुनावणी झाली यात  राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साईबाबा यांच्यासह अन्य पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा