Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या वडिलांना मारहाण

एकतर्फी प्रेमातून प्रेयसीच्या वडिलांना मारहाण
, सोमवार, 24 एप्रिल 2017 (12:46 IST)
एकतर्फी प्रेमातून प्रियकराने प्रेयसीच्या आईवडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. 
 
हा प्रकार काल रात्री छावणी परिसरात घडला. मारहाण करणाऱ्या एकतर्फी प्रियकराविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
प्रशिक आत्माराम वानखेडे असे एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. छावणी परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रशिक खूप दिवसांपासून पाठलाग करत होता. तसेच एकदिवस प्रशिक ने हद्द पार करत तिच्याशी बळजबरी अंगलट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला.
 
अल्पवयीन मुलीने सतत होणाऱ्या त्रासाबद्दल काल रात्री आईवडिलांना सांगितले. अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी प्रशीत चे घर गाठत त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता, प्रशीत व त्याच्या आईवडिलांनी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनाच शिवीगाळ करत मारहाण केली. 
 
या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांनी प्रशिक वानखेडे, आत्माराम वानखेडे, लताबाई वानखेडे यांच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 
 
या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. खंडागळे करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चालत्या विमानात राष्ट्रगीत, प्रवासी चक्रावले!