Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आठशे फुट खोल दरीत फेकले, तरीही गर्भवती वाचली

crime in matheran
, मंगळवार, 3 एप्रिल 2018 (16:48 IST)

माथेरान येथे एका विवाहित महिलेस तिच्या नवरयाने ८०० फुट खोल दरीत ढकलले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून गर्भवती महिला बचावली आहे. ही  घटना रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये घडली आहे. या महिलेला पोलिस आणि गिर्यारोहकांच्या पथकाने दरीतून सुखरुप बाहेर काढल आहे. सुरेश पवार आणि विजया पवार हे दाम्पत्य सोमवारी आपल्या मुलासह माथेरानला फिरायला आले होते. मंत्रालयात ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या सुरेश पवारचं विवाहित असलेल्या विजयाशी 9 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. या प्रकरणात  सुरेश आणि विजयाची आधी ओळख झाली होती मग ओळखीचं रुपांतर मैत्रीत झाल होत. त्यानंतर सुरेशने विजयाचा मुलांसह स्वीकार केला होता. यातील महिला विजयाला  पहिल्या नवऱ्यापासून तीन अपत्य आहेत. दोन मुलं चेन्नईतील हॉस्टेलमध्ये शिकत असून लहान मुलगा तिच्यासोबत राहतो. मात्र विजयाने तिचा पती कडे  मला तुझ्या घरी घेऊन चल, अशी रट लावली होती. त्यामुळे रोजच्या कटकटीला कंटाळून सुरेश पवारने तिचा काटा काढण्याचं ठरवल होता. तिचा काटा काढायला  सुरेश विजयाला माथेरानला घेऊन गेला होता.  तिथे सुरेशने कड्यावरच्या गणपती पॉईंटपासून तिला 800 फूट खोल दरीत ढकल होता. मात्र महिलेचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली आहे. मात्र तिने नवऱ्या विरोधात तक्रार देणार नाही असे पोलिसांना सांगितले आहे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गाडीत गुदमरून भाजून चिमुकल्याचा मृत्यू