Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खासगी शिकवणी : केबिन मध्ये बोलाऊन शिक्षक करायाचा मुलींसोबत नको ते ..

crime in tuition classes
, मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019 (15:29 IST)
ट्युशनकरिता खासगी कोचिंग क्लासमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींचे शिक्षकानेचलैंगिक शोषण केल्याची धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणी सिंहगड पोलिसांनी चौकशीसाठी शिक्षकाला पकडले आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉलसमोर शिक्षा अकॅडमी नावाचा खासगी क्लास सुरु आहे. या ठिकाणी  इयत्ता नववी ते इयत्ता बारावीपर्यंतचे क्लासेस आहेत. या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थिनींना संचालक जयप्रकाश पाटील हे मुलींना केबिनमध्ये बोलवून त्रास देत असे, सोबतच त्यांना नको तिथे स्पर्श करणे, हात लावणे, अश्लील बोलणे असे त्यांचे वर्तन होते. अखेर मुलींनी पालकांना सांगितल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकाला क्लासमध्ये जाऊन चोप दिला. या संबंधीचा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही: निवडणूक आयोग