Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 25 February 2025
webdunia

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी

bhimashankar
पुणे , मंगळवार, 1 मार्च 2022 (09:40 IST)
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त रात्री बारा वाजता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत शिवलिंगाला महादुग्धाभिषेक करत शासकीय महापूजा करण्यात आली.
 
महाशिवरात्रीनिमित्त भिमाशंकर चरणी महाभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. रात्रीपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हर हर महादेव, जय जय भोलेनाथच्या घोषाने भीमाशंकर परिसर दणाणून गेला. भिमाशंकर परिसरात देशभरातून अनेक भाविक मोठ्या संख्येने आले आहेत.
 
माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर दोन वर्षानंतर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली तर शिवमंदिर आणि सभामंडण विविध रंगाच्या फुळांनी सजविण्यात आला आहे. भिमाशंकरला शासकीय पुजा संपन्न झाल्यानंतर रात्रीपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जूनमध्ये भारतात दाखल होणार कोरोनाची चौथी लाट, जाणून घ्या IIT कानपूरचे तज्ज्ञ काय म्हणाले