Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकचे सायकलिस्ट जगदीश गायकवाड 5900 किलोमीटरच्या अनोख्या सायकल मोहिमेस रवाना

nashik cyclist jagdish gaikwad
, सोमवार, 28 ऑगस्ट 2023 (08:09 IST)
social media
नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे सदस्य जगदीश गायकवाड हे शांतता व एकतेचा संदेश घेऊन सहा देशांमध्ये सायकल प्रवास करणार आहेत. यापूर्वी त्यांनी आयोध्या ते श्रीलंका पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन सायकल प्रवास केला होता. तसेच गंगोत्री ते बांगलादेश गंगा स्वच्छता अभियान घेऊन यशस्वी सायकल प्रवास केला होता.
 
इंडिया ते इंडोनेशिया ही तब्बल 5900  की.मी. सायकल मोहीम शंभर दिवसात पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे. सायकलवर ते व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया या सहा देशात भेट देणार आहेत. तेथील संस्कृती, पर्यटनस्थळ याचा अभ्यास करत संपूर्ण प्रवास ते सेल्फ सपोर्टेड करणार आहेत.

त्यांच्या या प्रवासास शुभेच्छा देण्यासाठी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या वतीने सोमेश्वर महादेव मंदिर येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. भगवान शंकराचे आशीर्वाद घेऊन या रॅलीची सांगता आनंदवली येथील मारुती मंदिर  येथे झाली. या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी छोटेखाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे प्रणेते हरीश बैजल त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झालीयावेळी सातपूर सभापती तथा माजी नगरसेवक संतोष गायकवाड, शिवसेना माजी गटनेते विलास शिंदे, भीमराव कडलग, महेश हिरे, अरुण काळे, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन, नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, किशोर काळे, विशाल उगले, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले, इतर सायकलिस्ट तसेच आनंदवली येथील समस्त ग्रामस्थ, गायकवाड परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
 
जगदीश गायकवाड यांचे महिलांनी औक्षण केले. नंतर या अनोख्या सायकल मोहिमेस हरीश बैजल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समाजसेवा करणाऱ्यांना पाठबळ देणे माझा राजधर्म- राजे समरजितसिंह घाटगे