Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईला ओखी चक्रीवादळचा धोका

मुंबईला ओखी चक्रीवादळचा धोका
येत्या काही तासात ओखी चक्रीवादळ पुढच्या काही तासात कोकण किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीतल्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हे वादळ आता थेट मुंबई आणि कोकणाच्या दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार 6 तारखेपर्यंत सावधानता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई किनारपट्टीतही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
 
पुढच्या 48 तासात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः 4 आणि 5 डिसेंबरला मुंबई लगतच्या अरबी समुद्राला ओखी वादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई, कोकणात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या ओखी वादळाच्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बेटी बचाव बेटी पढ़ाओ' साठी जांगड़ा धावले नाशिक ते शिर्डी