Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही करा पण लोकांचे पैसे द्या, डीएसकें १३ फेब्रुवारीरोजी कोर्टासमोर

काही करा पण लोकांचे पैसे द्या, डीएसकें १३ फेब्रुवारीरोजी कोर्टासमोर
, मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (09:22 IST)

कोर्टाने  डीएसकें यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे.  डीएसकें यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. कोर्ट म्हणाले की काही करा पण गुंतवणूक ज्यांनी त्यांचे पैसे परत करा. त्यामुळे आता कोर्टाने त्यांना आपले मत मांडायला वेळ दिला असून पुढच्या तारखेला म्हणजेच 13 फेब्रुवारीलाच कोर्टासमोर हजर राहणार आहेत. डीएसकेंनी माध्यमांसोबत बोलताना यासंबंधीची माहिती दिली आहे 

डीएसकें म्हणतात की कोर्टाने मला हजर राहायला सांगितल आहे. त्यामुळे आता मी माझी  बाजू मांडणार आहे.   मी आजपर्यंत तपास यंत्रणेला आत्तापर्यंत पूर्ण सहकार्य केलं आहे, मी कोठेही पळून गेले नाही. आत्ताही मी सर्वाना  सहकार्य करणार आहे. त्यामुळे मी आता  गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी माझ्या मालमत्ता विकाणार आहे. मात्र  काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात कायदेशीर अडचणी निर्माण करताहेत त्यामुळे अडथळे निर्माण होत आहे. हे सर्व मिळून  लोकांमध्ये अफवा पसरत आहेत. त्यामुळे मालमत्ता विकत घेण्यासाठीही कोणी पुढे येत नाही. त्यामुळे मी आता रक्कम जमा करण्यासाठी क्राऊड फंडिंगचा वापर करणार आहे. जगभरातील माझे मित्र मला आर्थिक करतील असा मला विश्वास आहे. मात्र  कायदेशीर बाबींमुळे मला पैसे परत करण्यास अडचणी उभ्या राहिल्या आहेत, पण मी कुठेही पळून जाणार नाहीये, सगळ्यांचे पैसे परत करणार आहे.सलग तिसऱ्यांदा डीएसके गुंतवणूकदारांसाठीचे 50 कोटी कोर्टात भरण्यास असमर्थ ठरलेत.डीएसकेंनी 'क्राऊड फंडिंग'चा पर्याय कोर्टासमोर ठेवला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे म्हणाले भुजबळ छोडो आंदोलन करा