राज्यात दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोविंदा उंच मनोरे रचून दहीहंडी फोडतात. दरवर्षी रचलेल्या उंच मनोऱ्यातून पडून बरच गोविंदा जखमी होतात किंवा त्यांचा दुर्देवी मृत्यू होतो. यंदा राज्यातील दही हंडी उत्सव आणि प्रो -गोविंदा लीग सारख्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी राज्य सरकार ने मान्य केली आहे.
राज्यातील गोविंदा पथकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमा संरक्षणाची मागणी केली असून उप मुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी मागणी स्वीकार केली असून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. विमा संरक्षणाचा लाभ राज्यातील 50 हजार गोविंदांना होणार असून त्यासाठी लागणारा प्रत्येकी 75 रुपयांप्रमाणे 37 लाख 50 हजार रुपयांचा विमा हप्ता महाराष्ट्र राज्य दहिहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. समितीला तशी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गोविंदा पथकाकडून करण्यात आलेली विमा संरक्षणाची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. याबाबत गोविंदा पथकाने सरकारचे आभार मानले आहे.
मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरीच्या निवासस्थानी 11 जुलै 2023 रोजी जाऊन गोविंदांच्या विमा संरक्षणाची मागणी केली असून सव्वामहिन्यांच्या आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोविंदांची मागणी मान्य केली आहे. गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याच्या शासनाचा निर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे.