Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अस्वच्छता पाहून DCM Ajit Pawar महापालिका आयुक्तांवर संतापले

ajit panwar
, बुधवार, 6 डिसेंबर 2023 (11:02 IST)
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील भीम अनुयायांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठा रांगा लावल्या आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा सकाळीच 7.30 वाजता चैत्यभूमीवर दाखल झाले. पण मुख्यमंत्री, राज्यपाल यांना यायला काही वेळ असल्याचे समजताच त्यांनी त्या वेळेत चैत्यभूमी परिसराची पाहाणी केली. यावेळी अजित पवार हे चैत्यभूमी परिसरात असलेल्या व्ह्यूईंग गॅलरीमध्ये गेले. परंतु, तेथील अस्वच्छता पाहून त्यांनी थेट महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन करून संताप व्यक्त केला. तर त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांनाही त्यांनी झापले आहे. 
 
दरवर्षी महानगर पालिकेकडून चैत्यभूमी, दादर शिवाजी पार्क परिसरात विशेष खबरदारी घेत तयारी करण्यात येत असते. परंतु, यंदाच्या वर्षी मुंबई मनपाकडून करण्यात आलेल्या सोयीमध्ये कमतरता असल्याची तक्रार अजित पवारांकडे करण्यात आली होती. पण चैत्यभूमी परिसरात असलेल्या व्ह्यूईंग गॅलरीमध्येच अस्वच्छता असल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेस पडले. ज्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांनाच झापायला सुरुवात केली. चैत्यभूमी येथील स्थानिक रहिवाश्यांनी थेट अजित पवारांकडे अस्वच्छतेची तक्रार केली. यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना बोलावून तेथेच अस्वच्छतेवरून खडेबोल सुनावले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांना व्ह्यूईंग गॅलरी येथे बोलावून घेतले आणि या परिरात स्वच्छता का नाही, याची विचारणा केली. या व्ह्युईंग गॅलरीत असलेली रोपं देखील कोमजली असल्याची माहिती अजित पवारांनीच आयुक्तांना दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Home Guard Foundation Day होमगार्ड स्थापना दिन