Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह ,त्या आत्महत्या नाहीत, तर याने केला घात वाचा सविस्तर वृत्त

crime
, बुधवार, 25 जानेवारी 2023 (15:06 IST)
पुणे : भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात असतानाच आता त्याला वेगळे वळण मिळाले असून त्यांच्या चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. याबाबतची अधिकृत माहिती दुपारनंतर जाहीर केली जाईल, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी सांगितले.
 
मोहन पवार हे यांचे चुलत भावाने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मोहन पवार यांचा मुलगाबरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाला अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही. ४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. या घटनेचा राग मनात धरुन चुलत भावाने या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांत पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात चार मृतदेह मिळून आले. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. यानंतर केलेल्या शोधकार्यात तीन मुलांचे मृतदेह सापडले. या प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची कबुलीही दिली आहे. आरोपीच्या एका भावाचा काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सदर कुटुंबियांनी अंधश्रद्धा आणि करणीच्या माध्यमातून केल्याचा आरोप आरोपींनी केला आहे. त्याच रागातून संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
१) मोहन उत्तम पवार वय वर्षे ४५ मूळ राहणार गाव खामगाव तालुका गेवराई जि. बीड. (पती)
२) संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार वय ४५ वर्ष राहणार खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड (पत्नी)
३) राणी श्याम फलवरे वय २४ वर्ष राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (विवाहित मुलगी)
४) श्याम पंडित फलवरे वय २८ वर्षे राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद(जावई)
५) रितेश उर्फ भैय्या श्याम फलवरे वय वर्ष ७ राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू)
६) छोटू श्याम फलवरे वय वर्ष ५ राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू)
७) कृष्णा श्याम फलवरे वय वर्ष ३ राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू)
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ICC ODI Rankings:मोहम्मद सिराज बनला जगातील नंबर गोलंदाज