Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

अंधेरीत आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह

dead body of dr. satpute
, गुरूवार, 28 डिसेंबर 2017 (09:19 IST)

मुंबई येथील उच्चभ्रू वस्तीत अंधेरीमध्ये राहत्या घरात महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला त्यामुळे परिसरात  खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पूनम सातपुते यांचा मृतदेह सापडला आहे. सातपुते या  अंधेरी वेस्टमध्ये राहत होत्या , त्यांच्याच फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला आहे. तर  फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. प्राथमिक तपास केला असता  पूनम यांचा मृत्यू ३ ते ४ दिवसांपूर्वी झाला होता असे  डॉक्टरांचा अंदाज आहे. मृत्यू का झाला हे मेडिकल रिपोर्ट पोस्त मोर्टम अहवाला आला की कळणार आहे. अंधेरी येथील  अंबोली स्टेशनचे  पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.  पूनम सतपुते ४५ वर्षीय या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मात्र त्या त्या फ्लॅटमध्ये  एकट्या राहत होत्या. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार त्या डायबिटीज पेशंट सुद्धा  होत्या. मंगळवारी रात्री शेजारच्या व्यक्तींनी अंबोली पोलिसांना फोन करुन याबाबत कळविले की  पूनम यांच्या घरातून दुगंर्ध येत असून दरवाजा अनेक दिवसापासून बंद आहे. पोलिसांनी याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी जेव्हा घरात गले तेव्हा तेव्हा त्यांचा मृतदेह हा त्यांच्या बेडवर होता. पोलीस अधिक तपास करत आहेत.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हार्बर लाईनवर पुन्हा दोन दिवस मेगा ब्लॉक