Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शासकीय कोविड सेंटरच्या मागणीसाठी आमरण उपोषण

शासकीय कोविड सेंटरच्या मागणीसाठी आमरण उपोषण
, मंगळवार, 25 मे 2021 (08:37 IST)
अहमदनगरच्या देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरू असलेले खासगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देणेसाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे अन्यथा नगरपालिकेच्या गेट समोर आमरण उपोषण करणार असल्याचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले  यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
 
चार दिवसाचे चाळीस हजार रुपये बिल भरायला पैसे नसल्याने या खाजगी कोविड सेंटरमध्ये अडकून पडलेल्या देवळाली प्रवरा येथीलच रुग्णाला सोडवायला आंदोलन करायची वेळ आल्याने ढुस यांनी अहमदनगर चे जिल्हाधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन दिले आहे.
 
निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटरची माहिती मिळणे कामी संदर्भीय पत्रान्वये आम्ही दि. १३ मे रोजी नगरपालिकेला विनंती केली आहे. तथापि आज पावेतो नगरपालिकेने आम्हास माहिती उपलब्ध करून दिली नाही.
 
त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारती मध्ये सुरू असलेल्या खाजगी कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची लूटमार होत असलेबद्दल आमची खात्री झाली आहे.
 
तसेच कोरोनाची तिसरी लाट येणेपूर्वी या खाजगी कोविड सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून त्याचे शासकीय मोफत कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे किंवा नगरपालिकेने ते स्वतः चालवावे या बाबत आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केली आहे.
 
त्यावरही नगरपालिकेने अद्याप पावेतो कोणताही निर्णय घेतला नाही. म्हणून आपणास विनंती की, (१) या खाजगी कोविड सेंटरची नगरपालिकेकडून माहिती मिळावी, (२) या कोविड सेंटरची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी,
 
या कोविड सेंटर मध्ये आणखी काही बेड वाढवून ते शासकीय कोविड सेंटर करावे, किंवा नगरपरिषदेने ते  कोविड सेंटर स्वतः चालवीनेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी व येथील नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून कोरोनाची तिसरी लाट येनेपूर्वी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना आश्वस्थ करावे.
 
आदी मागण्यासाठी गुरुवार दि. १० जून २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. पासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेट समोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत असे निवेदनात आप्पासाहेब ढुस यांनी म्हंटले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची रुग्ण संख्या घटताच ऑक्सिजनची मागणीही निम्याने घटली