Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती मातेचा व बालकाचा ही गर्भात मृत्यू

डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे गर्भवती मातेचा व बालकाचा ही गर्भात मृत्यू
रवी राऊत/यवतमाळ , मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (11:00 IST)
अवधुतवाडी पोलीस स्टेशन दिलेल्या तक्रारीवरून मनीष रमेश धोटे रा. शारदा नगर यवतमाळ यांची पत्नी सौ दुर्गा मनीष धोटे (२२) यांचा वर्षाभरापूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ती गर्भवती राहिली. पहील्या महिन्यापासुन दुर्गाला डॉ. अभय बेलसरे यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. सुमारे ९ महीने उपचार घेल्यानंतर दोन दिवसांपूर्वी दुर्गाच्या पाठीत दुखत असल्याने तिला उपचारासाठी डॉ. बेलसरे यांच्याकडे नेण्यात आले. यावेळी दुर्गाची प्रकृती ठणठणीत होती. मात्र एक तास रूग्णालयात बसवून ठेवल्यानंतर डॉ. अभय बेलसरे यांनी तपासणीसाठी आत बोलावले. त्यानंतर त्यांच्या जवळील एक इंजेक्शन दिल्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर डॉ. बेलसरे यांनी रुग्णांचे नातेवाईक पती मनीष यांना बाहेरुन सोनोग्राफी तसेच रक्त तपासणी करुन आणण्यास सांगितले. 
 
एकंदरीत चुकीचा उपचार झाल्यानंतर माता व बालकाचा गर्भातच मृत्यु झाल्याची घटना २९ जानेवारीच्या सायंकाळी घडली. 
 
 अतिगंभीर झालेल्या दुर्गा हिला जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागात भरती करण्यात आले. दरम्यान जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र सायंकाळी दुर्गाची प्राणज्योत मालवली.
 
त्यासोबतच ९ महीने पूर्ण झालेल्या बाळाचाही मृत्यू झाला. अवघ्या २२ वर्षाच्या दुर्गाच्या मृत्युने धोटे कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. डॉ. अभय बेलसरे यांच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एका गरोदर मातेचा मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Budget 2022: बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय काय असतं?