सध्या समाजातील रूढींना लढा देत काही गोष्टी घडत आहे. आता मुली देखील अंत्यसंस्कार करत आहे. मुखाग्नी देत आहे. असेच समाजातील रूढींना लढा देत दोन तरुणींनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्धार घेत क्रांतिकारी पावले घेत एकमेकांसह आयुष्य घालवण्याचा निर्णय घेत त्यांनी साखरपुडा केला आहे. हे घडले आहे नागपूर येथे. नागपुरात डॉ सुरभी मित्रा आणि कोलकात्याच्या पारोमिता यांनी एकमेकांची आयुष्यभर साथ देण्याचा विचार करत साखरपुडा केला. नागपूरची सुरभी या डॉक्टर आहे तर कोलकाताच्या पारोमिता या एका कार्पोरेट कंपनीत उच्च पदाधिकारी आहेत. नागपूरच्या एका रिसॉर्टवर त्यांच्या साखरपुडाचा समारंभ पार पडला. प्रेम करणाऱ्या या तरुणींना त्याच्या कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाला आहे. त्या दोघींची भेट कोलकात्यात एका कॉन्फरन्स मध्ये झाली. नंतर त्यांची मैत्री झाली आणि मग त्या दोघी एकमेकांच्या प्रेमात पडल्या नंतर त्यांनी साखरपुडा करण्याचे निश्चित केले. त्यांनी लग्न करण्याचे निश्चित केले .सुरभीने म्हणणे आहे की या नात्यात आम्ही दोघीही पत्नी असणार आमच्या घरात कधीही लिंगभेद केला नाही. आणि आम्हाला दोघींना आई व्हायचे आहे. या साठी आंम्ही मूल दत्तक घेऊ किंवा सरोगेसी ने मातृत्वाचे सुख घेऊ असे सांगितले.
आम्ही हा निर्णय घेतल्यावर आमच्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. कोणीही आम्हाला विरोध केला नाही. किंवा आमच्याशी नातं तोडले नाही.
पारोमिता म्हणाल्या की, मी अकरावीत असताना तिच्या विषयी तिच्या बाबा आणि बहिणीला समजले. आईला सांगितल्यावर तिने देखील हे स्वीकारले तिचा विरोध नाही.