Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्धनग्न महिलांच्या व्हिडीओतील चेहर्‍यावर फोटो लावून व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी …

अर्धनग्न महिलांच्या व्हिडीओतील चेहर्‍यावर फोटो लावून व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी …
, शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (08:17 IST)
फोटोतील चेहर्‍याचा गैरवापर करुन अर्धनग्न महिलांच्या व्हिडीओतील चेहर्‍यावर लावून हे व्हिडीओ व्हाट्सअपवर व्हायरल करुन बदनामी केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरात घडली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन व्हिडीओ व्हायरल केलेा गेलेल्या मोबाईल क्रमांकाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अल्ताफखान पठाण (वय 51) व्यवसाय-शेती रा. धनगर गल्ली,
 
नुराणी मस्जिदसमोर नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझा पुतण्या अदनानखान सादीकखान पठाण रा. नाईकवाडी गल्ली नेवासा खुर्द याच्या व्हाट्सअप क्रमांकावर अज्ञात इसमाच्या व्हाट्सअप क्रमांकावरुन व्हाट्सअपद्वारेअसे वेगवेगळे व्हिडीओ तयार करुन त्यात माझ्या फोटोतील चेहर्‍याचा गैरवापर करुन तयार केले तसेच अर्धनग्न महिलांच्या शरीरावर माझ्या फोटोचा चेहरा लावून अश्लील हावभाव दाखविणारे व्हिडीओ पाठविले.
 
बर्‍याच लोकांना सदर व्यक्ती हे व्हिडीओ पाठवित आहे. त्यामुळे माझी बदनामी होत आहे. तसेच मला व माझ्या परिवाराला हे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे मनस्ताप होत आहे. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी व्हिडीओ व्हायरल केलेल्या  मोबाईल क्रमांकाच्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारीय दंड विधान कलम 292 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(सी), 67), 67(ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकमध्ये ओमायक्रोन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळला!