Publish Date: Sat, 18 Feb 2017 (10:43 IST)
Updated Date: Sat, 18 Feb 2017 (10:46 IST)
गरिबांसाठी असलेल्या जिल्हा रुग्णालयानं उपचार करण्यास टाळाटाळ केल्यामुळे एका माहेरी निघालेल्या महिलेची बसमध्येच प्रसुती झाली आहे.अक्कलकुवा या बसमध्ये घटना घडली आहे . ही घटना नामपूरजवळच्या शारदा या गावात गरिबीत काम करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या माई गायकवाड या महिलेचं हे पहिलंच बाळंतपण होणार होते. यामध्ये कळवणच्या ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आल आहे. हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगत त्यांना नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल होते . मात्र येथे तिला सुविधा होण्याऐवजी बाळ बाळंतीणीच्या जीवाला धोका असल्याचं सांगत खासगी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितल आहे .हतबल झालेली महिला माहेरला परत जात असताना बसमध्येच तिची प्रसुती झाली आहे. गायकवाड यांनी मुलाला जन्म दिला असून ते दोघेही सुखरूप आहेत.तर गावातील लोकांनी विशेषतः महिलांनी तिला मदत केली आहे.