गंगोत्रीच्या महामार्गावर कोपांगजवळ प्रवाशांनी भरलेल्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या कार मध्ये चालकासह एकूण 15 जण होते. त्यापैकी दोघे जागीच ठार झाले आहे.
महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथून एका टेम्पो ट्रॅव्हल ने 15 जण चारधाम यात्रेसाठी निघाले होते. रविवारी रात्री 12:30 च्या सुमारास गाडी गंगोत्री धाम मधून निघून हरसीलच्या दिशेने जात असता गंगोत्रीपासून 15 किमीच्या अंतरावर असलेल्या कोपांग आयटीबीपी कॅम्प जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन अनियंत्रित होऊन 100 मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात अलका बोटे आणि माधवन राहणार औरंगाबाद यांचा जागीच मृत्यू झाला तर उमा पाटील, अरनभ महर्षि, साक्षी सिंधे, अर्चना सिंधे, अनया महाजन, अनुप्रिया महर्षि, सई पवार, सुभाष सिंह राणा(रा. मानपूर), डॉ. वेंकेटेश, वर्षिता पाटील, आमरा एकबोटे, रजनीश सेठी व जितेंद्र सिंह(रा.देहरादून) जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळतातच कोपांग मध्ये तैनात 35 व्या आयटीबीपीने तातडीने बचावकार्य सुरु केले. जखमींना हरसीलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.