राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अयोध्येला जाऊन रामललांचे आशीर्वाद घेतले त्यांनी अयोध्येला जाऊन विधिवत पूजा केली. ते बुधवार पासून दोन दिवसीय वाराणसी आणि अयोध्या दौऱ्यावर होते. या वेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. आपण प्रभू रामाची पूजा करतो. तो आपल्यातील श्रद्धा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
अयोध्येतील राम मंदिर हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असून हा आमचा विश्वास आहे. आम्ही इथे प्रभू रामाचे दर्शनासाठी आलो आहोत. याचा राजकारणाशी किंवा निवडणुकीशी काहीच संबंध नाही. बुधवारी त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथन मंदिरात प्रार्थना केली.
या वेळी त्यांनी उत्तरप्रदेशातील मराठी समाजाशी संवाद साधला.या वेळी त्यांनी मंदिराच्या बांधकामापूर्वी आणि त्या दरम्यान त्यांनी अयोध्येला दिलेल्या भेटीवर विचार केला. या वेळी भाजप राम मंदिराचा राजकीय वापर करत असल्याचा विरोधकांच्या दाव्याला सडेतोड उत्तर देत म्हणाले, आमची प्रभू श्रीरामावर अपार श्रद्धा आहे. आमचे हिंदुत्व इलेक्टोरल नाही.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे, कारण वाराणसीसह उत्तर प्रदेशातील 13 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, ज्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहेत.