मुंबईत शेतकरी आहेत का, असा प्रश्न मलाही पडला होता. मी तसं अधिकार्यांना विचारलंही. मात्र चौकशी करुनच कर्जमाफी दिली जाणार असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर, मुंबईतले हे शेतकरी नेमके कोणते, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला होता.
‘आता जाहीर केलेली यादी प्रस्तावित लाभार्थ्यांची आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाची व्यवस्थित चौकशी करुन मगच कर्ज
माफी दिली जाणार आहे. मुंबई आणि उपनगरात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे. या शेतकऱ्यांची जमीन मुंबईलगत असण्याची शक्यता आहे, या शेतकऱ्यांनी मुंबईतील राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे. कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळया गोष्टी स्पष्ट होतील.’ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.