आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मनप्रीत सिंग या १४ वर्षीय मुलाने ब्लू व्हेल नावाच्या एका गेमपायी आत्महत्या केली. जगभरात १०० हून अधिक मुलांनी या गेमच्या नियमानुसार आपला जीव दिला आहे. हे लोण आता भारतात पसरू नये, यासाठी सतर्क राहण्याची गरज आहे. मनप्रीतला या खेळाद्वारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या मास्टरचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे . तसेच, पवार यांनी शालेय पोषण आहाराचे टेंडर मिळवण्यात होत असलेल्या गैरव्यवहार उघड केला. ठराविक जणांचीच इथे मक्तेदारी सुरू आहे, हे मी कागदपत्रांसह सिद्ध करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केेली. मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर देताना या अटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान न होता बचत गटांना प्राधान्य देण्याबाबत मंत्री काम करतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आज १ ऑगस्ट निमित्त गिरणी कामगारांच्या वतीने भव्य मोर्चा आयोजित केला आहे. देशाच्या या आर्थिक राजधानीला गिरणी कामगारांनी वाढवलं. पण आज अनेक वर्ष उलटली तरी गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न सुटलेला नाही. त्यांच्या वारसांना घरं मिळावीत यासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. आजच्या गिरणी कामगारांच्या मोर्चात राज्यभरातून लोक आले आहेत त्यांना न्याय मिळाला नाही. दोन ते अडीच लाख गिरणी कामगार घरांपासून वंचित आहे. अनेकांनी गिरणी कामगारांच्या हक्काची घरं गिळंकृत केली. गिरणी कामगार पूर्णपणे अडचणीत आहेत. सरकारने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशीही मागणी अजित पवार यांनी केली.