देवेंद्र फडणवीसांबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. पहाटे तीन वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता असं जरांगे यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर आदर्श आचारसंहित लागू झाली आहे तोपर्यंत मी कायद्याचं पालन करतो आहे. पण मी शांत बसणार नाही. ओबीसीतून आरक्षण घेणारच असा पुनरुच्चार मनोज जरांगे यांनी केला आहे.
काय म्हटलं आहे मनोज जरांगेंनी?
“आम्हाला जाणीवपूर्वक अडचणींत आणण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत हे केलं गेलं. मात्र न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिला. खरंतर सरकारने ही भूमिका घ्यायला हवी होती. पण तसं झालं नाही. ज्या जनतेच्या जिवावर मोठे झाले तेच नेते आमच्यावर अन्याय करतं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही जबाबदारी आहे. आंदोलन, कार्यक्रम चार महिन्यांपूर्वी झाले त्याचे गुन्हे आत्ता दाखल केले जात आहेत. जेसीबी लावले त्याचे गुन्हे आत्ता दाखल करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हे सगळं सुरु केलं आहे. माझ्या घराला तर नांदेडपासून नोटीस आली आहे. मी फुटणार नाही, हटणार नाही. कायद्याचं पालन करणार आहे. आदर्श आचारसंहिता आहे तोपर्यंत यांना पुन्हा सुख मिळतंय हरकत नाही. पण मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही. ” असं जरांगे यांनी म्हटलं आहे.