Devendra Fadnavis is the new Chief Minister of Maharashtra : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होऊन अवघ्या 10 दिवसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
तसेच प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. मुंबईत होणाऱ्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार होती. आज भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे आले आहे. यावेळी महायुतीने महाराष्ट्राची कमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
फडणवीस उद्या शपथ घेणार-
देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील. उद्या म्हणजेच 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे. याशिवाय भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते शपथविधी सोहळ्यात दिसणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्र भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी मुंबईत कोअर कमिटीची बैठक झाली, या बैठकीत निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, देवेंद्र फडणवीस विशेषत: निरीक्षक म्हणून उपस्थित होते. आता देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्यांच्या नावाला भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी मुंबईत कोअर कमिटीची बैठक झाली, या बैठकीत निर्मला सीतारामन, विजय रुपाणी, देवेंद्र फडणवीस विशेषत: निरीक्षक म्हणून उपस्थित होते. आता देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्यांच्या नावाला भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
यानंतर लगेचच महायुतीच्या आघाडीची बैठक होत असून, त्यात लवकरच महायुतीकडूनही अधिकृत मंजुरीची शिक्कामोर्तब होणार आहे. यानंतर ते आपल्या समर्थकांसह दुपारी 3.30 वाजता राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन घोषणा करणार आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून, त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. उद्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील आझाद मैदानावर फक्त दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेकडून एकनाश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार या दोन नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या दोन उपमुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि पुन्हा सरकार स्थापन करतील.