Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"देवेंद्र फडणवीस कान फुंकण्याचं काम करतात",जरांगेंचे फडणवीसांवर आरोप

manoj jarange
, रविवार, 3 मार्च 2024 (14:54 IST)
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहे. फडणवीस यांचा मला सलाईन मधून विष देऊन मारण्याचा कट आहे असे खळबळजनक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. त्यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले होते. 
 
आता जरांगे यांनी आत्याची उपमा फडणवीसांना दिली आहे. ग्रामीण भागात ज्या प्रमाणे आत्या बाळाचे कान फुंकायची त्या प्रमाणे ते कान भरतात. असं जरांगे म्हणत आहे. माझी हत्या करण्याचा कट फडणवीस रचत आहे. माझ्या अंगावर कार्यकर्ते घालण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. पोलिसांना हाताशी धरून कान  भरणं सुरु आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी एसपीचे आणि पीसीआयचे कान फुंकले आहे गृहमंत्री हे पद जबाबदारीचे असून फडणवीस कान फुंकण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केले आहे. 
 
Edited By- Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गरोदर महिलेला घेऊन जाणारी अँब्युलन्स वाटेतच बंद पडली, बाळाला जन्म देऊन आई दगावली