Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 February 2025
webdunia

धनंजय मुंडेंनी दिलं मोठं वक्तव्य- मी राजीनामा देईन, पण

dhananjay munde
, बुधवार, 29 जानेवारी 2025 (20:08 IST)
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्येनंतर टीकेला सामोरे जावे लागत आहे. विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे विधान केले आहे. बुधवारी मुंडे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्यास तयार आहे. मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, “मी दोषी आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाटत असेल, तर त्यांनी माझा राजीनामा मागावा. मी पायउतार होण्यास तयार आहे. मी दोषी आहे की नाही हे त्यांनी ठरवायचे आहे. गेल्या 51 दिवसांपासून मला लक्ष्य केले जात आहे.
 
बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार मुंडे म्हणाले, “माझी नैतिकता माझ्या लोकांप्रती प्रामाणिक राहण्यात आहे. मी पूर्ण प्रामाणिकपणे बोलतो. मी स्वतःला नैतिकदृष्ट्या दोषी मानत नाही. जर मी दोषी असेल तर माझे वरिष्ठ नेते मला सांगतील.”
यापूर्वी राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असे म्हटले होते. मात्र, नैतिकतेच्या आधारावर मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची शक्यता मुंडे यांनी फेटाळून लावली.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Prayagraj Mahakumbh Stampede :महाकुंभ चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू ,प्रशासनाने जाहीर केली आकडेवारी