Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मल्टिप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांबाबत सरकारचा 'यू टर्न' गूढ आणि चमत्कारिक

मल्टिप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांबाबत सरकारचा 'यू टर्न' गूढ आणि चमत्कारिक
, रविवार, 12 ऑगस्ट 2018 (00:55 IST)
राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला यू टर्नचा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून या प्रकरणी पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी उपस्थित केला आहे.
 
नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मुभा असावी याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास अशी कुठलीही बंदी नाही, अशी बंदी कोणी करत असेल तर कारवाई करू तसेच १ ऑगस्टपासून खाद्यपदार्थांच्या किमतीची एकच एम.आर.पी. राहिल अशी भूमिका घेतली होती.
 
मात्र या भूमिकेवरून अचानक यू टर्न घेत सरकारने दोन दिवसांपूर्वी न्यायालयात सुरक्षिततेच्या कारणावरून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदीची भूमिका योग्य असल्याची भूमिका मांडली होती. सरकारच्या या भूमिकेवर धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे संशय व्यक्त केला असून सरकारने न्यायालयात घेतलेली यू टर्नची भूमिका गूढ आणि चमत्कारिक आहे. या पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या असाव्यात असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. विमानासारख्या सर्वोच्च सुरक्षा असणार्‍या ठिकाणीही बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नसताना मल्टिप्लेक्समध्ये अशी बंदी घालून सरकार मल्टिप्लेक्स चालकांना राज्यातील लाखो प्रेक्षकांची लूट करण्याचा उघड परवाना देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशातील पहिले इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवल