अनेकदा पोलीस विविध गोष्टीसाठी मॉक ड्रिल करून चाचणी करतात. महाराष्ट्रातील धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरात पोलिसांचे मॉक ड्रिल सुरु होते. या मंदिरात दहशतवादी आल्याचे इथल्या रहिवाशांना समजल्यावर चांगलीच धांदल उडाली.
रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. धुळे शहरात देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरल्याचे समजले. हे धुळे पोलिसांनी मॉक ड्रिल केले होते. या मॉक ड्रिल मध्ये एका व्यक्तीला दहशतवादी केले होते. दहशतवादी मंदिरात आल्याचे समजल्यावर नागरिकांनी दहशतवादी बनलेल्या व्यक्तीला चांगलेच चोपून काढले.
धुळे शहरात देवपूर भागात असलेल्या श्री स्वामीनारायण मंदिरात दहशतवादी शिरल्याचा फोन पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात आला. या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दहशतवाद्यांना ताब्यात घेतले.नंतर पोलिसांनी दहशतवाद्यांचं तावडीतून चार भाविकांची सुटका केली. या सर्व प्रकारामुळे महिला, वृद्ध, लहान मुले घाबरले होते. या नंतर एका नागरिकाने दहशतवादी बनलेल्या व्यक्तीला चांगलेच चोपले. नंतर हे सर्व पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे समजल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. नंतर ही घटना पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यांनी चोप देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले.