Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अपघाताचे फोटो काढताना वाहनाच्या धडकेत मृत्यू

अपघाताचे फोटो काढताना वाहनाच्या धडकेत मृत्यू
, रविवार, 5 मार्च 2023 (11:35 IST)
सध्या कोणतीही घटना घडली असेल लोकं ती सोशल मीडियावर शेअर करतात. एका  अपघाताचे फोटो काढणे एका शेतकऱ्याला जीवावर बेतले असून त्यात शेतकऱ्याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू  झाल्याची घटना 3 मार्च रोजी  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात हर्सूल रोडवर मधुरा लॉन्स समोर घडली आहे. बाबासाहेब अंबादास काळूसे (53)असे या मयत शेतकऱ्याचे नाव आहे.  

शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने भावाच्या मेहुण्याला धडक दिल्याचे समजतातच जाधववाडीतील बाबासाहेब अंबादास काळुसे हे अपघातस्थळी  पोहोचले आणि फोटो काढू लागले. फोटो काढताना त्यांना सावंगीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिली आणि ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात  आले असता त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

BBC ISWOTY 2022 : विजेती कोण? आज होणार घोषणा