Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक मनपाच्या कोषागार विभागात घोटाळा

Nashik mahapalika
, मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (08:27 IST)
मनपाच्या कोषागार विभागात घोटाळा झाला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशी केली जात आहे.
महापालिकेच्या कोषागार विभागात नियमित भरणा झालेली रक्कमच जमा केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार चौकशीचे कामकाज करण्यात येत आहे. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांवर आक्षेप आहे, त्यांची लेखा विभागाकडून चौकशी करण्यात आली असून त्यानंतर आता एलबीटी विभागाच्या माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे.
 
दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या विरोधात आधी लेखा विभागाने चौकशी करून काही रक्कम आक्षेपित केली आहे. आता संबंधित कर्मचाऱ्याने यापूर्वी एलबीटी विभागात काम केलेले असताना या विभागातही घोळ करण्यात असून त्याची चौकशी आता एलबीटी विभागामार्फत करण्यात येत आहे एलबीटी विभागाच्या प्रत्येक पावती पुस्तकाची छाननी करण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्याने चौकशीस प्रारंभ होऊनही चौकशीस देखील कागदपत्रे आणि संचिका दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे एलबीटी विषयाचा कार्यभार असणाऱ्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी या कर्मचाऱ्यास तंबी दिल्यानंतर त्यांनी कागदपत्रे सुपूर्द केले.
 
दरम्यान आधी एलबीटी आणि नंतरर कोषागार कार्यालयात काम करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित भरणा का केला नाही असा प्रश्न केला जात असून त्यामुळे या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त आहे काय असाही प्रश्न केला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भयंकर, पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या