rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रावते यांना बेळगावात पोहोचताच आले नाही

dinkar ravate
बेळगावमधील मराठी भाषकांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सीमाभागातील कोगनोळी नाक्यावर बेळगाव पोलिसांनी अडवले. बेळगाव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली जिल्हा बंदीची नोटीस रावते यांना दिल्यानंतर रावते आपल्या समर्थकांसह माघरी फिरले. त्यामुळे बेळगाव प्रश्नासाठी निघालेल्या शिवसैनिकांना बेळगावात पोहोचताच आले नाही. 
 
कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात बेळगावातील मराठी जनतेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यास शिवसेना नेते दिवाकर रावते यांना परवानगी नाकारली आहे. रावते या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने रवाना झाले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहा अल्पवयीन मुली पोहोचल्या शाहरुखच्या घरी