Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिग्दर्शक महेश लिमये लातूर जिल्ह्यासाठी करणार हे काम

दिग्दर्शक महेश लिमये लातूर जिल्ह्यासाठी करणार हे काम
, बुधवार, 4 डिसेंबर 2019 (15:40 IST)
पर्यावरण बिघडवण्यात आपलाच हात आहे. आम्ही चित्रपटांसाठी प्रचंड डिझेल जाळतो, मोठमोठे लाईट्स वापरतो पण आम्हाला पर्यावरणासाठी काहीच करता येत नाही. लातुरात लातूर वृक्षने उत्तम काम चालवले आहे. किमान त्यांना तरी मदत केली पाहिजे. मी स्वत: लातुरात येऊन या चळवळीला मदत करीन असं अभिवचन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, दिग्दर्शक महेश लिमये यांनी दिले. 
 
ते चित्रपट महोत्सवासाठी लातुरात आले होते. यावेळी लातूर वृक्षच्या कामाची दखल घेत सर्व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. लिमये उत्तम कॅमेरामन, दिदर्शक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांचे फॅशन, दबंग, बालक पलक आणि फ्रीकी अली उत्तरनारायण, कार्पोरेट, बालगंधर्व, नटरंग, यासारखे चित्रपट प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी Yellow या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कारही जिंकला आहे. या भेटीवेळी लातूर वृक्षचे समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ. बीआर पाटील, रितेश बिसेन, राहूल लोंढे, डॉ. पवन लड्डा, तुकाराम गुणवंते उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सर्व सुविधा देणार