Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा सकारात्मक, आजही चर्चा सत्र सुरूच राहणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची चर्चा सकारात्मक, आजही चर्चा सत्र सुरूच राहणार
सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साडेपाच तासाच्या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चर्चा सकारात्मक दिशेने सुरु आहे. या बैठकीनंतर शुक्रवारी महासेनाआघाडीची एकत्र बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत सत्तास्थापनेवर सकारात्मक चर्चा झाली. आता आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक होईल. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित बैठक होईल. या बैठकीनंतर संध्याकाळच्या सुमारास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मुंबईसाठी रवाना होतील. यानंतर शुक्रवारी शिवसेनेसोबत अंतिम चर्चा होईल. या चर्चेनंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
 
”दरम्यान महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत वेगवान घडामोडी घडल्या. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. संध्याकाळी पाचवाजता या बैठकीला सुरुवात झाली. जवळपास साडे पाच तास या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली.या बैठकीनंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली. “महाराष्ट्रामध्ये गेल्या 21 दिवसांपासून जी अस्थिरता चालली आहे. ती संपवण्याकरिता आणि राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली मात्र अजूनही चर्चा सुरु आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माहिती आहे का ? रेल्वेला 'यातूनही' कोट्यावधीचा महसूल मिळतो