मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांच्यावर आहे.
मुंबईतल्या दादर माहिम परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळी निमित्त लावलेल्या कंदिलांवर महापालिकेने कारवाई केली. महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. त्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.