Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू

मुंबई, ठाण्यात मोफत डाळ वाटप सुरू
मुंबई , बुधवार, 13 मे 2020 (09:23 IST)
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी ५ किलो मोफत तांदळाचे माहे मे महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रति शिधापत्रिका प्रतिमाह १ किलो डाळ या परिमाणात ( तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ १ किलो या कमाल मर्यादेत) माहे एप्रिल व मे महिन्याची एकूण २ किलो मोफत डाळीचे वाटप आजपासून सुरु करण्यात आले असल्याची माहिती कैलास पगारे, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे.
 
चार मेपासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे मे महिन्याचे नियमित ३ किलो गहू व २ किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये २ प्रति किलो दराने गहू व रुपये ३ प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना ३५ किलो धान्य प्रति शिधापत्रिका रु. २ प्रति किलो दराने गहू व रु. ३ प्रति दराने तांदूळ वितरित करण्यात येत असून आतापर्यंत ५१ % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ई-संजीवनी-ओपीडी वेबसाइटद्वारे राज्यातल्या नागरिकांना घरबसल्या मोफत मिळणार डॉक्टरांचा सल्ला