Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी

मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी
, बुधवार, 7 जून 2017 (17:16 IST)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिवसेना मंत्र्यांनी दांडी मारली. यावेळी शिवसेनेचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आरोग्य मंत्री दीपक सावंत बैठकीला गैरहजर राहिले. मात्र तरीही मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यात आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०१६ – २०१७ मध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्याकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रति क्विंटल १० रुपये भरडाई दराव्यतिरिक्त प्रति क्विंटल ३० रुपये वाढीव भरडाई दर राज्य शासनाकडून मंजूर केला . राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील दंतशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक, दंतशल्यचिकित्सक या पदांवर विभागीय निवड मंडळ पुरस्कृत उमेदवार म्हणून तात्पुरत्या नियुक्तीने कार्यरत उमेदवारांच्या सेवा नियमित करण्यास मंजुरी दिली. राज्याचे महाअधिवक्ता या पदावर आशुतोष कुंभकोणी यांच्या नियुक्तीची राज्यपालांना शिफारस करण्यास मान्यता दिली . आणि  उमरेड, कुही व भिवापूर या तालुक्यांसाठी उमरेड (जि. नागपूर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यास मान्यता दिली. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकरी संपाला नाना पाटेकरांचा पाठिंबा