Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नका : अजित पवार

माझा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नका : अजित पवार
, सोमवार, 17 डिसेंबर 2018 (09:11 IST)
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये असे  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले.बारामती तालुक्यातील पणदरे येथील खासगी कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी शिवसेनेवर राजकीय भूमिकेबाबत पवार यांनी टीका केली. यावेळी पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावध भूमिका घेत कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंतप्रधान व आपला भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करू नये. पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचं राजकारण होतं. या पाडापाडीमुळेच आमची माती झाली असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
 
पवार म्हणाले, की कार्यकर्त्यांनी अगोदर आघाडीचं बहुमत कसं मिळेल, यावर लक्ष द्यावे. पाच राज्यांतील निवडणूक निकालात भाजपाची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा भाजपाचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकार थातूरमातूर उत्तरं देत आहे. समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शेवटी कुणी काय करावं, हा ज्याचा-त्याचा प्रश्न असल्याचेदेखील पवार यांनी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय पोस्ट लवकरच 'ई- कॅामर्स' मध्ये उतरणार