शेतकरी आंदोलनाची परदेशी कलाकारांनी घेतली, एका व्यक्तीने परदेशातून आंदोलनाला पाठिंबा दिला तर तिळपापड होण्याची गरज नाही, आपणदेखील ट्रम्प यांना अमेरिकेत जाऊन पाठिंबा दिला होताच. अबकी बार ट्रम्प सरकार काय म्हणण्याची गरज नाही, तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची गरज काय? असा सवाल शिवसेनेची खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरही टीका करताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात, शेतकरी नेत्यांनी चर्चा करावी, आंदोलन संपवावं, हे आम्हालाही वाटतं, तुम्ही शेतकरी नेत्यांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा...हजारो शेतकरी ३ महिन्यापासून ऊन, पावसात दिल्लीच्या सीमेवर बसले आहेत, तुम्ही त्याची दखल घ्या ना...भाषण करायला काय झालं, संसदेत भाषण केलं किंवा बाहेर केलं त्यातून निष्पन्न काय झालं? असंही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.