Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

जेजेचा संप कायम, तोडगा नाही, रुग्णांचे हाल

doctors on strike
, मंगळवार, 22 मे 2018 (11:16 IST)
मुंबई येथील  जेजे रुग्णालायातील निवासी डॉक्टर यांचा संप अजूनही सुरु आहे. चार दिवसांपूर्वी निवासी डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारल आहे. डॉक्टरांच्या या संपामुळे रुग्णांची मोठे हाल  होताना दिसत आहे. जोपर्यंत मागण्यांची अंमलबजावणी करण्यात येणार नाही, तोपर्यंत जेजे रुग्णालयातले निवासी डॉक्टर संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. असे स्पष्ट  केले आहे.

संपकरी डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकारी यांची काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक झाली होती. यात सकारात्मक चर्चा झाली. मात्र सुरक्षेसंबंधी मागण्यांची पूर्तता प्रत्यक्षात होईपर्यंत संप सुरुच राहणार असल्याचं संपकरी डॉक्टरांनी स्पष्ट केल आहे. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डची सुरक्षा तातडीनं वाढवावी यामागणीसाठी संप कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार कधी ही सुरक्षा वाढवते आणि कधी हे सर्व डॉक्टर संपावरून बाहेर पडतात   असे झाले आहे. लवकर संप मिटला तर अनेक रुग्णाचे हाल थांबणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवीन आयपीएल : महिलांचे आयपीएल आजपासून सुरु