Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब किती मोठा डोम

अबब किती मोठा डोम
, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (10:19 IST)

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठा असा डोम (घुमट) साकारला जात आहे. विश्‍वशांती केंद्र आळंदी, मिरर्स एमआयटीकडून राज बागेत हा डोम बांधला जात आहे. हा डोम 160 फुटांचा व्यास आणि दोनशे पंधरा फूट उंचीचा आहे. या घुमटाचा सभामंडप साठ हजार चौरस फुटांचा असणार आहे. यामध्ये भव्य ग्रंथालय, अठ्ठेचाळीस संत-तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या पुतळ्यांचा वेढा, तसेच चहू बाजूला मिनार असणार आहे. घुमटाचे काम आकर्षक अशा संगमरवरात करण्यात येणार आहे. एकूणच नेत्रदीपक कमानी आणि कारंजेयुक्त असा डोम आहे.आगामी दीड ते दोन वर्षात याचे बांधकाम पूर करण्यात येणार आहे.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरबीआयकडून कर्जदारांना दिलासा, कर्ज परत फेडीसाठी ६० दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ