Publish Date: Wed, 26 Apr 2017 (18:12 IST)
Updated Date: Wed, 26 Apr 2017 (18:14 IST)
कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी पुन्हा एकदा संचित रजा (फर्लो) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे. अरुण गवळीने संचित रजा मिळण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, वर्षातून दोन वेळा प्रत्येकी 14 दिवसांची संचित रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असल्यामुळे त्याला रजा देण्याचे आदेश खंडपीठाने दिले. यापूर्वी नागपूर खंडपीठाने गवळीला मुलाच्या लग्नासाठी पॅरोलवर सोडले होते.