एका विचित्र घटनेत मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील बांद्याहून मुंबईला येणार्या एका खासगी बसच्या चालकाने प्रवाशांना बसमध्ये सोडून जंगलात पळ काढला. ड्रायव्हरने बस सोडून पलायन केले तेव्हा सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. यामुळे मोठी खळबळ उडाली.
काळभैरव ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचालकाने सर्वांनाच हैराण केलं. थांबलेल्या बसमध्ये जेव्हा रात्री 3 वाजेच्या सुमारास प्रवाशाला जाग आली तेव्हा बस का थांबलीय हे पाहण्यासाठी तो सीटवरुन उठून पुढे आल्यावर त्याला ड्रायव्हर दिसला नाही. काही वेळ वाट पाहिली तरी चालक आला नाही म्हणून त्या प्रवाशाने इतर प्रवशांना उठविण्यास सुरु केले.
नंतर प्रवाशांनी पोलिसांची संपर्क साधला. पहाटे चिपळूण पोलिसांचे एक पथक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले मात्र बसचा मालक, बुकिंग एजंट यांचे फोन लागत नसल्यामुळे खळबळ उडाली.