सध्या पावसाळा सुरु आहे. या हंगामात लोक वर्षा विहारासाठी जाण्याचा बेत आखतात. आणि सहलीला पाण्याच्या ठिकाणी, धबधब्यात जातात. सध्या पार्टकांचे आवडीचे ठिकाण दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन आणि वन विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दूधसागर धबधबा दक्षिण गोव्यातील मोठे प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणाहून रेल्वे जाते. या भागातून निघताना रेल्वेचा वेग कमी होतो. अनेक पर्यटक या ठिकाणी येतात.
गेल्यावर्षी या धबधब्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन, आणि वन विभागाने पावसाळा कमी होई पर्यत या धबधब्यावर पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रेल्वे या ठिकाणी थांबते. काही अति उत्साही प्रवासी या धबधब्यात उतरतात. रेल्वे प्रशासनाने दूधसागर रेल्वेस्थानकावर कोणीही उतरू नये अशी सूचना दिली आहे. नियमाचा उल्लन्घन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे म्हटले आहे.