पुणे येथील भोसरी जमीन हस्तांतरण प्रकरणात माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणत वाढल्या आहेत. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एसीबीकडे सोपवण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य सरकारनं आज हायकोर्टात दिली आहे. तर याप्रकरणी एसीबीनं खडसेंविरोधात रितसर एफआयआर नोंदवावी. असे आदेश हायकोर्टानं आज दिले आहेत.
महाराष्ट्र एसीबीकडे सोपवण्यात आला असून एसपी दर्जाचा अधिकारी याचा तपास अधिकारी म्हणून काम पाहणार आहे असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे . तर अतिरिक्त महासंचालक दर्जाचा अधिकाऱ्याकडे यासंबंधी रिपोर्ट देण्यात येईल असेही सरकारने नमूद केले आहे.त्यामुळे आता खडसे यांचा पुढील प्रवास खडतर होणार हे नक्की असे चित्र आहे.