Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता मंत्रिपद नकोच : खडसे

आता मंत्रिपद नकोच : खडसे
मुंबई , बुधवार, 28 फेब्रुवारी 2018 (11:19 IST)
मंत्रिमंडळ विस्तारात एकनाथ खडसेंना सरकारमध्ये समावेश आणि खडसेंचे पुनवर्सन कधी होणार? या प्रश्नांना खुद्द एकनाथ खडसेंनीच आता पूर्णविराम दिला असून आता या सरकारमध्ये मंत्री होण्याची अजिबात इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जळगाव जिल्ह्यातील नादुरुस्त रस्त्यांसह प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींसह सभागृहात आणि सभागृहाबाहेर आवाज बुलंद करणार असल्याचे खडसे म्हणाले.
 
खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील वादग्रस्त जमीन खरेदीप्रकरणी चौकशी करणार्‍या माजी न्यायमूर्ती झोटिंग यांनी सरकारला अहवाल देऊन सहा महिने उलटले. हा अहवाल मुख्य सचिवांकडे सीलबंद स्वरूपात ठेवण्यात आला आहे. मंत्रिमंडळातील प्रवेशाविषयी खडसेंना विचारले असता ते म्हणाले, आता मंत्रिमंडळात प्रवेशाची माझी इच्छाच उरली नाही. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची चाळण झाली असून आम्ही सर्व आदार मुख्यंत्र्यांना भेटणार आहोत. कृषी संशोधन संस्था आणि महाविद्यालयाचे प्रश्न काय आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

’पेमेंट्स वॉलेटच्या केवायसी’ ला मुदतवाढ नाही