Earthquake in Kolhapur महाराष्ट्रातील भूकंप नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 3.4 रिश्टर स्केलचा मध्यम तीव्रतेचा भूकंप झाला. NCS ने सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार 06:45 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप 5 किमी खोलीवर झाला.
कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे तात्काळ वृत्त नाही. विशेष म्हणजे कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रात मुंबईपासून 375 किमी अंतरावर आहे.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरले. लोक घराबाहेर पडून उघड्यावर रस्त्यावर आले. मात्र या भूकंपामुळे कोणतीही हानी झालेली नाही. याआधी सोमवारी मेघालय आणि बांगलादेशच्या उत्तर भागात 5.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता.
या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटांच्या 112 किमी SSE मध्ये 4.3 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले.