राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंचे ट्विटर अकाऊंटचे फोटोशॉप केले गेले आहे. तर हे फोटोशॉप केलेल्या इमेजमध्ये परीक्षा रद्द झाल्याची खोटी माहितीही शेअर केली आहे. मात्र, काही वेळातच शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी आपल्याच ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही तावडे यांनी केलय. विनोद तावडेंचे ट्विटर अकाऊंटचे फोटोशॉप करुन त्यावर एफ वाय बी.कॉमच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे सांगितले होते. याबद्दल माहिती होताच, तावडेंच्या टेक्निकल टीमने अकाऊंटवरुन विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच सुरू असलेल्या बी. कॉम. एफवायच्या परीक्षाला विद्यार्थ्यांनी हजर राहावे, सर्वांना शुभेच्छा असे तावडेंनी म्हटले आहे.